शालेय शिक्षणातील ८ वी पर्यंतच्या परीक्षा बंद करण्याच्या जंजाळात सध्याच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करीत आहे. महावीर क्लासेसच्या माध्यमातून आज आम्ही ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी खासगी शिकवणी वर्ग घेत आहोत. शालेय व कनिष्ट महाविद्यालयीन स्तरावरील बदललेले अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीतील बदल याचा चांगला – वाईट अनुभव आमच्या गाठीला आहे. शालेय पातळीवर आठवीपर्यंतची परीक्षा गेल्या सहा वर्षांपासून बंद आहे. विद्यार्थी परीक्षा न देता थेट नववीत येत आहे. त्या वर्गात पहिली परीक्षा त्याला द्यावी लागते. आठवीपर्यंत परीक्षाच नसल्याने विद्यार्थ्यांची गणित, विज्ञान या विषयांची पायाभूत तयारीच होत नसल्याचे आम्हाला आढळून येत आहे.