शिक्षकदिन तोंडावर आला आहे. शिक्षक हा घटक आजही सर्व प्रकारचे कौशल्यपूर्ण काम शिकवणारी माताच आहे म्हणजे, Teacher is the Mother of all Professions. . माजी राष्ट्रपती तथा शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर शिक्षकदिन म्हणून साजरा होतो. यामागे भूमिका अशी की, डॉ. राधाकृष्णन हे महान विचारवंत व देशाचे राष्ट्रपती होते. शिक्षकाचा एवढा मोठा सन्मान भारतवर्षांत झाला. त्यांचाच गौरव म्हणून शिक्षकदिन साजरा होतो.