शिक्षकदिन तोंडावर आला आहे.
शिक्षक हा घटक आजही सर्व प्रकारचे कौशल्यपूर्ण काम शिकवणारी माताच आहे म्हणजे, Teacher
is the Mother of all Professions..
माजी राष्ट्रपती तथा
शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर शिक्षकदिन म्हणून साजरा
होतो. यामागे भूमिका अशी की, डॉ. राधाकृष्णन हे महान विचारवंत व देशाचे राष्ट्रपती
होते. शिक्षकाचा एवढा मोठा सन्मान भारतवर्षांत झाला. त्यांचाच गौरव म्हणून
शिक्षकदिन साजरा होतो.
आपण आजही म्हणतो की, शिक्षक
भावी पिढी घडवतात. मुलांचे भवितव्य घडवतात. त्याद्वारे देशाचे भवितव्य घडत असते. म्हणूनच
मातृ-पितृदिन साजरे केल्यानंतर सर्वाधिक कौतुकाचा दिवस हा शिक्षकदिन असतो. त्यादिवशी
सर्व प्रकारच्या शिक्षणाशी संबंधित गुरूजनांचा मान-सन्मान केला जातो. आजही ही
परंपरा सुरू आहे.
आम्ही क्लासेसमधील सर्व
शिक्षक मंडळी असे मानतो की, वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याकडे कोणतातरी एक गुण
वेगळा किंवा विशेष असतो. शिक्षकांनी अशा गुणांचे ग्राही असावे. मुलांना त्यासाठी
प्रोत्साहन द्यावे. कोताही मुलगा मंद, गतीमंद, कमी हुशार असत नाही. त्याच्यातील
क्षमता ओळखण्याचे कौशल्य शिक्षकाच्या ठायी असावे. शिक्षकांना माहित आहे की, “Student
do not care how much you know unless he knows how much you care.”
मला शालेय व माध्यमिक
शिक्षणात चांगले शिक्षक मिळाले. म्हणूनच मी आज न थकता ५ वी ते १२ वीच्या मुलांना
मार्गदर्शन करीत आहे. त्यांच्या शिकवण्या घेत आहे. पहिली ते सातवी दरम्यान मला सोनार
गुरूजी होते. ते मुख्याध्यापक होते पण आम्हाला शिकवत असत. त्यांनी शिस्तीचे व अभ्यास
करण्याचे संस्कार दिले. आजही एखाद्या विषयाचा अभ्यास केल्याशिवाय मी वर्गावर शिकवत
नाही. आठवी ते १० वी दरम्यान म. दी.
राव नावाचे शिक्षक होते. त्यांनाही राष्ट्रीय
पुरस्कार मिळाला होता. तेही मुख्याध्यापक असूनही वर्गावर शिकवत. अशाच एक निफाडकर
मॅडम होत्या. त्यांनी माझ्या हस्ताक्षराचे नेहमी कौतुक केले. एस. पी. कुळकर्णीसरांनी
मला इंग्रजी शिकवले. इंग्रजीच्या छोट्या छोट्या टीप्स ते लिहून देत. आम्ही त्या
पाठ करत असू. त्यातून आमचे इंग्रजी पक्के झाले. मी जेव्हा क्लास घेणे सुरू केले
तेव्हा त्यांच्याच सूचनांवर शिकवत असे. मला घडविणाऱ्या सर्व शिक्षकांना मी आज शिक्षकदिनी
वंदन करतो.
आमच्या आयुष्यातील या
शिक्षकांचा संस्कार घेवून मी उभा आहे. आजही शिक्षकांची आठवण आली की गहीवरून येते. त्यांच्याशी
आजच्या शिक्षकांची तुलना केली तर स्थिती समाधान देत नाही. यात सरळसोट दोष
शिक्षकांचा नाहीच. काही सरकारी निर्णय, काही सामाजिक प्रथा यातून शिक्षकाकडे
पाहण्याचा दृष्टीकोन व जबाबदारी बदलली आहे. अशाही स्थितीत शिक्षकांनी मात्र आपली
गुणवत्ता व आपल्यातील अध्यापन कौशल्य वाढीकडे लक्ष द्यावे असे मला वाटते. तसे
केल्याने शिक्षकाचा विकास तर होतोच पण, समाजाचाही विकास होतो. शेवटी समाजाचे देणे
कसे परत करायचे हा आपापला स्वतःचा प्रश्न आहे. प्रामुख्याने यात शिक्षकाकडून सर्वांत
जास्त अपेक्षा आहेत.
शिक्षणाविषयीची तीव्र आवड,
एकाग्रता, शिकण्यातील सातत्यता, विद्यार्थी पालकांचे अभिप्राय, प्रमाणिक प्रयत्न, झोकून
देण्याची वृत्ती आदींमुळे शिक्षक हा महान शिक्षक बनतो.
शिक्षक है एक दीपक की छवी
जो जलकर दे दुसरोंको रवि
ना रखता वो ख्वाईश बडी
बस, शिष्यो की सफलता है
खुशियोंकी लडी.
शिक्षक म्हणजे,
आयुष्याला कलाटणी देणारी
प्रेरणा,
ध्येय पूर्तीसाठी मार्ग
दाखविणारी दिशा,
कधी बिकट परिस्तिथीत
प्रेमाची साथ,
तक कधी पाठीवरील शाबासकीचा
हात,
कधी कौतुकाचे गोड शब्द,
तर कधी हातावर बसणारा छडीचा
मार.
प्रत्येकाला कोणी ना कोणी
गुरू असतो पण, माणुस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. ही माझी धारणा. म्हणून मला
भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून मग तो लहान असो की मोठा असो मी काही तरी चांगले
घेण्याचा प्रयत्न करीत असतो. मनातल्या मनांत त्यांना गुरु मानतो. आयुष्याच्या प्रत्येक
वळणावर, टप्यावर क्षणा क्षणाला भेटलेल्या त्या माझ्या असंख्य गुरुंना आज शिक्षक
दिनी शतशः नमन. त्रिवार वंदन !!!
Nice one Sir!
ReplyDelete& you are really a great teacher.
I always remember you whenever there is a Math.
For me its like MATH=Gadiya_Sir.
Thank You So much Sir!!
Your Student
-Ritesh Gajeshwar
२G,३G,४G आले....
ReplyDeleteभविष्यात ५G,६G सुद्धा येतील......
पण ,
"गुरुG" ला पर्याय नाही !
🙏शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏