Skip to main content

मुलांसह पालकांचे कौन्सिलींग आवश्यक

दहावी, बारावीनंतर पाल्यांचे करियर कोणत्या क्षेत्रात घडवावे असा प्रश्न पालकांना असतो. याबरोबरच विद्यार्थी सुद्धा कोणत्या शाखेकडे जावे याविषयी साशंक असतात. दहावी, बारावीच्या परीक्षेत कितीही गुण मिळाले तरी पुढील पदवी शिक्षणाची दिशा निवडताना सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य होवून बसले आहे. याशिवाय उच्च शिक्षणाशी संबंधित प्रवेश प्रक्रिया फार गुंतागुंतीची होत चालली आहे. अशा प्रवेश परीक्षांचे प्रवेश अर्ज भरण्यापासून तर कॉलेजसाठीचा चॉईस निवडण्यापर्यंत अनेक अडथळे विद्यार्थी व पालकांना पार पाडावे लागतात. हा सर्व अनुभव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या कल चाचण्या घेणे आणि त्यावरुन त्यांच्या आवडीचे किंवा गुणवत्तेचे क्षेत्र निवडणे सोपे जाते. 

महावीर क्लासेसमध्ये दहावी, बारावीच्या मुलांसाठी असलेल्या वर्गात नेहमी नव्या करियर संधी विषयी माहिती दिली जाते. दर रविवारी नियमित वर्गासह आवांतर चर्चाही केली जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांना लेखी प्रश्न विचारायची संधी दिली जाते. विद्यार्थी त्यांच्या मनातील प्रश्न लिहून देतात. त्यात वैद्यकिय, अभियांत्रिकी, तंत्र, मार्केटींग, कॉमर्स, डिफेन्स आदी क्षेत्रातील करियर विषयी प्रश्न असतात. परंतु गेल्या काही वर्षांतील मुलांची उत्सुकता लक्षात घेता स्पर्धा परीक्षांकडे कल वाढत असल्याचे दिसते.

एकाच क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा, त्यातील गुंतागुंत, एकाचवेळी येणाऱ्या प्रवेश परीक्षा, करिअरच्या नव्या संधी-नव्या वाटा, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, बदलणारे नियम, ऑनलाईन होणारी सर्वच व्यवस्था अशा बाबी पालकांसह पाल्यांना त्रासाच्या वाटतात. महावीर क्लासमधील नियमित वर्गात याविषयी माहिती दिली जाते. बऱ्यावेळा पालक व विद्यार्थ्यांच्या एकत्र बैठका घेवून त्यांना प्रवेश परीक्षांची माहिती दिली जाते. अशावेळी मुलांची कल चाचणी किंवा क्षमता चाचणी करुन घ्यावी असा आग्रह कोला जातो. मोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारच्या कल चाचणी लक्षात घेवूनच मुला-मुलींचे भविष्यातील करिअर कोणते असावे हे निश्चित केले जाते.

महावीर क्लासेसमध्ये मुलांचे कौन्सिलींग करताना काही तज्ञांची मार्गदर्शन व्याख्याने घेतली जातात. त्यात हेमचंद्र शिंदे, केतन देशपांडे (पुणे) यांना आनंत्रित केले जाते. ते विविध क्षेत्रांची माहिती देतात. या सोबत रविवारच्या चर्चेत विविध क्षेत्रातील आयकॉन्सची माहिती दिली जाते. कोणी कशा प्रकारे आपले करिअर घडविले, कसे परिश्रम घेतले, कशा प्रकारे यश मिळविले याची माहिती मुलांना देण्यात येते. परीक्षांचा अभ्यास, स्वयं मूल्यमापन, सुधारणा, टाईम मॅनेजमेंट या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाते.

आजच्या मुलांना नेहमीच्या वैद्यकिय व अभियांत्रिकी क्षेत्रासह एरोनॉटीक्स, आर्किटेक्चर, इलेक्ट्रीकल्स, आयआयटी या क्षेत्रांविषयी उत्सुकता दिसून येत आहे. स्पर्धा परीक्षांकडे मुलांचा कल वाढतो आहे. मुलांच्या अशा प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे द्यावी लागतात. मुले त्या करिअरकडे आकृष्ट होत असताना त्यांना त्याची सकारात्मक माहिती देणे आवश्यक असते. मुलांमध्ये विनाकारण भीती निर्माण करुन किंवा ते त्या क्षेत्रापासून परावृत्त होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. हेच लक्षात घेवून मुलांचे व पालकांचे करिअर कौन्सिलींग करतो.

बारावीचे वर्ष हे जरी मुलांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट असले तरी त्याची तयारी खऱ्या अर्थाने नववी, दहावी, अकरावी व बारावी पासून केली पाहिजे. मुलांच्या करिअर कल किंवा क्षमता चाचण्या या पाचवी पासून सातत्याने घेतल्या पाहिजेत. त्याच्या सततच्या निष्कर्षातून बारावीपर्यंत करिअर निश्चित करायला मदत होते. अशा विषयांवर मुलांसह पालकांनी अधिक सजग, जागृत व्हायला हवे. तरच मुलांच्या पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणावरील खर्च सत्कारणी लागून शकतो. अन्यथा मुलांचे करिअर चुकीच्या दिशेने जाण्याची शक्यता असते.

Comments

Popular posts from this blog

मुलांना अभ्यासाच्या उत्तम सवयी कशा लावाव्यात ?

शालेय, महाविद्यालयीन जीवनातील किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील परिक्षेला सामोरे जावून य़श मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येकाला करावा लागतो. यश मिळवणे तसे अवघड असले तरी सातत्याचे परिश्रम, प्रयत्न व चिकाटी लक्षात घेता यश मिळवणे तसे सोपेही असते. परिक्षेतील असो की व्यवहारातील असो कोणतेही यश मिळविण्यासाठी नियोजन, सूत्र, आखणी आणि निश्चित दिशा गरजेची असते. यशाचे अंतिम ठिकाण निश्चित असले की तसे प्रयत्न केले जातात आणि परिश्रमही घ्यावे लागतात.   

महावीर क्लास ३० वर्षांच्या परंपरेत अव्वलच !!

सध्या परीक्षांचे निकाल लागण्याचा हंगाम आहे. दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. आता विद्यार्थी आणि पालक पुढील शिक्षण कोणते घ्यावे ? या विषयी निर्णय घेत आहेत. पारंपरिक क्षेत्रातील पदवी आणि इतर वेगवेगळ्या नव्या   क्षेत्रातील शिक्षणांच्या संधी मुलांच्या समोर आहेत. हा काळ शांतपणे व विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. मुलांनी व पालकांनी घाई न करता मुलांच्या शिक्षणाचा कल, क्षमता लक्षात घेवून पुढील शिक्षणाचा मार्ग निवडावा. मुलांच्या भावी जीवनाला आकार देण्याचा हाच काळ असतो. अशावेळी पालकांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी महावीर क्लासेसच्या माध्यमातून आम्हीही पार पाडत   असतो. अशा प्रकारच्या सहकार्यास आम्ही व आमचे तज्ञ नेहमी तयार असतो.