मार्च महिना सुरु होतोय. दहावी, बारावीसह इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षाचा हंगाम सुरू होण्याचा हा काळ आहे. परीक्षेला सामोरे जाताना पाल्य तणावात असतात. अभ्यासाचे वेळापत्रक तयार करुन त्याचे पालन करतात. या परीक्षा आटोपल्यानंतर प्रवेश किंवा स्पर्धा परीक्षांचा काळ सुरू होतो. म्हणजे, मार्च महिन्यात आत्मसात केलेला अभ्यास हा पाल्यांना किमान तीन ते चार महिने स्मरणात ठेवावा लागतो.