गेल्या काही दिवसांत विविध शाळांमधील मुलांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये यामिनित्त नव्या आव्हानांवर बोलता आले. मुलांशी संवाद करताना त्यांना सोप्या भाषेत समजून सांगावे लागते. त्यांचा मनांतील भावविश्वाला तडा न देता त्यांना नव्या संकल्पना समजावून सांगाव्या लागतात. हे काम तसे कौशल्याने केले पाहिजे. मुलांना समजतील अशा गोष्टीचा, कथांचा वापर त्यासाठी करावा लागतो. मुलांच्या समस्यांवरील उत्तर शोधताना अशा गोष्टी, कथा उपयुक्त ठरतात. त्या सांगितल्यामुळे नेमका परिणाम साधला जातो.