Skip to main content

मुलांना जिंकायेच शिकवा !!

गेल्या काही दिवसांत विविध शाळांमधील मुलांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये यामिनित्त नव्या आव्हानांवर बोलता आले. मुलांशी संवाद करताना त्यांना सोप्या भाषेत समजून सांगावे लागते. त्यांचा मनांतील भावविश्वाला तडा न देता त्यांना नव्या संकल्पना समजावून सांगाव्या लागतात. हे काम तसे कौशल्याने केले पाहिजे. मुलांना समजतील अशा गोष्टीचा, कथांचा वापर त्यासाठी करावा लागतो. मुलांच्या समस्यांवरील उत्तर शोधताना अशा गोष्टी, कथा उपयुक्त ठरतात. त्या सांगितल्यामुळे नेमका परिणाम साधला जातो.



जळगाव येथील पी. एम. मुंदडे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना महावीर क्लासेसतर्फे शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटपाचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात मी प्रमुख पाहुणा होतो. मुख्याध्यापक भरत पाटील अध्यक्षस्थानी होते. संजय बडगुजर, जयंत पाटील, तुषार मंत्री आदी उपस्थित होते.

अशाच प्रकारे बोदवड येथील न. ह. राका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात माझ्या प्रमुख उपस्थितीत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीचा कार्यक्रम झाला. मी या शाळेचा माजी विद्यार्थी असल्यामुळे तेथील मुख्याध्यपकांनी बोलावले होते. दोन्ही ठिकाणच्या अनुभवातून काही बाबी समोर आल्या.

दोन्ही शाळांच्या ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना लक्षात आले की, ग्रामीण मुलांची आकलन क्षमता चांगली आहे. शहरी मुलांच्या तुलनेत त्यात फारसा भेद नाही. मात्र, मुलांच्या आकलन क्षमतेचा वापर शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या आकलनासाठी करुन घेण्याकडे शिक्षकांनी लक्ष द्यायला हवे. ग्रामीण मुलांमध्ये पाठ्यपुस्तकांच्यासोबत इतर पुस्तकांचा वाचनाचे प्रमाण वाढायला हवे. त्यात रंजकता हवी, सातत्य हवे. चर्चा हवी. असे केल्याने मुले आपापसात बोलू लागतात. त्यातून त्यांचे शैक्षणिक आकलन वाढून प्रश्नोत्तराचा सराव होतो. गेल्या १५-१६ वर्षांपासून हा माझाही अनुभव आहे.

ग्रामीण शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना अनंत अडचणी असतात. त्यांना सर्व सुविधा उपलब्ध होत नाहीत. प्रतिकुल स्थितीमुळे त्यांच्या शिक्षणाची गती थांबणार नाही याची काळजी शिक्षक व संबंधित शिक्षण संस्थाचालकांनी घ्यायला हवी. अशावेळी मुलांना आंबेडकर, फुले यांच्या जीवनातील प्रसंग आवर्जून सांगितले पाहिजे. त्यातून त्यांना प्रेरणा मिळते. राष्ट्रपुरुषांच्या विचार व कार्याची ओळखही होते.

मुलांमध्ये आत्मविश्वास निर्मीतीसाठी बराक ओबामा, ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याही गोष्टी सांगितल्या पाहिजे. कारण आर्थिक स्थिती कशीही असली तरी जिद्दीने शिक्षण घेता येते असा संदेश यातून दिला जातो. आयुष्यातील निश्चित ध्येय गाठण्यासाठी येस आय कॅन विन हा विश्वास मुलांमध्ये निर्माण करता येतो. शिक्षकांनाही बऱ्याचवेळा मी आवाहन करतो की, गणितात सर्व प्रकारचे कोन आपण शिकवतो. विशाल, लघूकोन मुलांना समजावून सांगता येतो. पण मुलांमध्ये दृष्टीकोन हा निर्माण करावा लागतो. तो निर्माण करण्यासाठी शिक्षकांनीही आवांतर वाचन करून मुलांना विविध प्रकारची माहिती देवून हुशार केले पाहिजे. मुलांना आजच्या स्पर्धात्मक परीक्षा पद्धतीत पुढे जाण्याची हिंमत दिली पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा बाऊ त्यांच्या मनात उत्पन्न होईल असे तणावाचे समुपदेश करायला नको. मुलांना आयुष्य जगायचे ध्येय्य निश्चित करायला शिकवावे. तसे केल्याने ते पहिल्यापासून आपल्या निश्चित मार्गावर चालण्याची शक्यता अधिक असते. अलिकडे अशा प्रकारच्या काऊंसिलींग किंवा संवादाचा मुलांना लाभ होत असल्याचे मलाही अनुभवास आले आहे. या दृष्टीने शिक्षकांच्या प्रशिक्षणाविषयी काही करता येईल का ?  त्याचा प्रयत्न मी करीत आहे. बहुधा एखादा चांगला उपक्रम यातून तयार होवू शकतो असे मला वाटते. त्या दिशेने प्रयत्न नक्की सुरू केले आहेत.

Comments

Popular posts from this blog

मुलांना अभ्यासाच्या उत्तम सवयी कशा लावाव्यात ?

शालेय, महाविद्यालयीन जीवनातील किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील परिक्षेला सामोरे जावून य़श मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येकाला करावा लागतो. यश मिळवणे तसे अवघड असले तरी सातत्याचे परिश्रम, प्रयत्न व चिकाटी लक्षात घेता यश मिळवणे तसे सोपेही असते. परिक्षेतील असो की व्यवहारातील असो कोणतेही यश मिळविण्यासाठी नियोजन, सूत्र, आखणी आणि निश्चित दिशा गरजेची असते. यशाचे अंतिम ठिकाण निश्चित असले की तसे प्रयत्न केले जातात आणि परिश्रमही घ्यावे लागतात.   

मुलांसह पालकांचे कौन्सिलींग आवश्यक

दहावी, बारावीनंतर पाल्यांचे करियर कोणत्या क्षेत्रात घडवावे असा प्रश्न पालकांना असतो. याबरोबरच विद्यार्थी सुद्धा कोणत्या शाखेकडे जावे याविषयी साशंक असतात. दहावी, बारावीच्या परीक्षेत कितीही गुण मिळाले तरी पुढील पदवी शिक्षणाची दिशा निवडताना सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य होवून बसले आहे. याशिवाय उच्च शिक्षणाशी संबंधित प्रवेश प्रक्रिया फार गुंतागुंतीची होत चालली आहे. अशा प्रवेश परीक्षांचे प्रवेश अर्ज भरण्यापासून तर कॉलेजसाठीचा चॉईस निवडण्यापर्यंत अनेक अडथळे विद्यार्थी व पालकांना पार पाडावे लागतात. हा सर्व अनुभव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या कल चाचण्या घेणे आणि त्यावरुन त्यांच्या आवडीचे किंवा गुणवत्तेचे क्षेत्र निवडणे सोपे जाते.  

महावीर क्लास ३० वर्षांच्या परंपरेत अव्वलच !!

सध्या परीक्षांचे निकाल लागण्याचा हंगाम आहे. दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. आता विद्यार्थी आणि पालक पुढील शिक्षण कोणते घ्यावे ? या विषयी निर्णय घेत आहेत. पारंपरिक क्षेत्रातील पदवी आणि इतर वेगवेगळ्या नव्या   क्षेत्रातील शिक्षणांच्या संधी मुलांच्या समोर आहेत. हा काळ शांतपणे व विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. मुलांनी व पालकांनी घाई न करता मुलांच्या शिक्षणाचा कल, क्षमता लक्षात घेवून पुढील शिक्षणाचा मार्ग निवडावा. मुलांच्या भावी जीवनाला आकार देण्याचा हाच काळ असतो. अशावेळी पालकांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी महावीर क्लासेसच्या माध्यमातून आम्हीही पार पाडत   असतो. अशा प्रकारच्या सहकार्यास आम्ही व आमचे तज्ञ नेहमी तयार असतो.