Skip to main content

महावीर क्लास ३० वर्षांच्या परंपरेत अव्वलच !!


सध्या परीक्षांचे निकाल लागण्याचा हंगाम आहे. दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. आता विद्यार्थी आणि पालक पुढील शिक्षण कोणते घ्यावे ? या विषयी निर्णय घेत आहेत. पारंपरिक क्षेत्रातील पदवी आणि इतर वेगवेगळ्या नव्या  क्षेत्रातील शिक्षणांच्या संधी मुलांच्या समोर आहेत. हा काळ शांतपणे व विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. मुलांनी व पालकांनी घाई न करता मुलांच्या शिक्षणाचा कल, क्षमता लक्षात घेवून पुढील शिक्षणाचा मार्ग निवडावा. मुलांच्या भावी जीवनाला आकार देण्याचा हाच काळ असतो. अशावेळी पालकांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी महावीर क्लासेसच्या माध्यमातून आम्हीही पार पाडत  असतो. अशा प्रकारच्या सहकार्यास आम्ही व आमचे तज्ञ नेहमी तयार असतो.

दहावी, बारावीच्या निकालानंतर महावीर क्लासेससाठी दरवर्षी आनंदाची पर्वणी असते. गेले ३० वर्षे पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खासगी शिकवणी वर्गाची एक गुणवत्तापूर्ण व स्पर्धात्मक सेवा आम्ही देत आहोत. या सेवेचा दरवर्षीचा सर्वोत्तम आनंदाचा काळ असतो तो दहावी, बारावी निकालाचा. यावर्षीही आम्ही आमची ३० वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे. ९० टक्केपेक्षा जास्त गुण असलेले सर्वाधिक विद्यार्थी, ९० टक्केपर्यंत गुण असलेले निम्मे विद्यार्थी असा आता  महावीर क्लासेसचा ट्रेण्ड असून आम्ही ते दरवर्षी पूर्ण करीतआहोत.

महावीर क्लासेसचा विद्यार्थी हा  आता महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात स्वतःच एक ग्रॅण्ड बनला आहे. महावीर क्लासेसचा विद्यार्थी म्हणजे सर्वोत्तम गुणवत्ता, शिस्त, सातत्य, परिश्रम आणि स्पर्धा हे आजचे वैशिष्ट्य तयार झाले आहे. आमच्या विद्यार्थ्यांमध्ये हे गुण निर्माण करण्यासाठी आमची कार्यशैली ही पायाभूत रचना आहे. त्यात शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासक्रमासह इतर बदलांचा प्रदीर्घ अनुभव, आमच्या प्रशिक्षित शिक्षकांचे कमाल गुणवत्ता साधण्याचे परिश्रम, कामातील नियमितता-सातत्य व शिस्त, मुलांकडून अभ्यास करून घेण्यासाठी उत्तम पद्धतीच्या टेस्ट सिरीज, शैक्षणिक तंत्रज्ञान जसे, एलईडी प्रोजेक्टर, व्हर्च्युअल क्लास रुम, ऑनलाईन टिचिंग आदीचा वापर, अधुन मधून विविध विषयांवरील तज्ञांची व्याख्याने, मुलांच्या अभ्यासाचे मुल्यांकन व जादा तयारीसाठी गाईडन्स अशा सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे, आमच्या सर्वोत्तम निकाल व गुणवत्तेची परंपरा होय. आमचे लक्ष केवळ विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास एवढ्यापुरतेच मर्यादीत नाही. तर आम्ही मुलांचा सर्वांगिण विकास हेच ध्येय कायम ठेवले आहे.

आज बारावीनंतर मुलांना उच्च शिक्षणाची अनेक दारे उघडतात. वैद्यकिय-अभियांत्रिकी शिक्षणाच्या प्रवेश परीक्षा, केव्हीपीवाय, ऑलिंपीयाड, होमीभाभा, स्कॉलरशीप, मॅथेक्स, एनटीएस आदी सर्व प्रवेश परीक्षांच्या तयारीचे वर्गही आम्ही उत्तमपणे व परिश्रमपूर्वक घेत असतो. त्याचाही महावीर क्लासेसचा निकाल इतरांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो.

महावीर क्लासेसच्या शैक्षणिक पद्धतीत मुलांच्या अभ्यास विषयक परिश्रमात व आकलनशक्तीत वाढ करणे हा जसा मुलतः हेतू आहे तसाच पालक आणि क्लासच्या शिक्षकांमध्ये विश्वासाचे नाते तयार करणे हाही हेतू आहे. महावीरच्या शिक्षण पद्धतीत पुस्तकी शिक्षणाच्यासोबत प्रायोगिक, कृतिशील व प्रात्यक्षिकांच्या शिक्षणालाही तेवढेच महत्त्व आहे. पूर्वी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नाशिक बोर्डात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महावीर क्लासेसचे विद्यार्थी लक्षणिय असत. आताही विषयनिहाय पैकी च्या पैकी गुण मिळविणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. याचे चांगले परिणाम सीईटी, जेईई, एनईईटी या सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये दिसून येतात. महावीर क्लासेसचे विद्यार्थी अशा परीक्षांमध्ये टॉप करू लागले आहेत.

महावीर क्लासेसमध्ये मुलांचा प्रवेश पाचवी पासून होतो. पहिल्यावर्षी मुलांना प्रवेश देताना आम्ही थेट पालकांशी बोलतो. पालकांचा व मुलांचे भविष्याकडे पाहण्याचा दृष्टोकोन व कल समजून घेतो. मुलाने कोणत्या शाखेकडे जावे याविषयी गरजेनुसार कौन्सिलिंग करतो. आमचा आता अनुभव असा आहे की, महावीर क्लासेसमध्ये मुलाच्या शिक्षणाची सोय  केली की, पालक निर्धास्त होवून जातात. बहुधा हेच आमच्या वरील विश्वासाचे पालकांचे फिक्स डिपॉझीट आहे. मुलांना परीक्षेत भरघोस गुण मिळाले की, पालकांची डिपॉझीटसह फरतपेड होते. ही बाब लक्षात घेवून आम्हीही मुलांचा शैक्षणिक मुलभूत पाया भक्कम करण्याकडे लक्ष देत असतो.

महावीरच्या वाटचालीत आज हजारो मुलांचे भवितव्य घडले आहे. शेकडो मुले समाजातील विविध क्षेत्रातील उच्चपदांवर विराजमान आहेत. यात जळगावचेचे विद्यार्थी डॉ. हर्षल लाहोटी, डॉ. अनिल गोयंका, किरण चौधरी, विक्रम वाकडे, अंकित चौधरी, श्रद्धा पुराणीक आदींचा उल्लेख करावा लागेल. ही यादी खुप मोठी आहे.

महावीर क्लासेसमध्ये शिक्षणाचा मुलभूत पाया मजबूत होत असल्यामुळे १२ वी नंतर कोणत्याही उच्च शिक्षणासाठी जाणारी मुले आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी परिश्रम करतात. आमच्याकडून त्यांना वेळोवेळी सहकार्य केले जाते. महावीर क्लासशी मुलांचा जुळलेला ऋणानुबंध हा आता पिढी जात होतोय. अनेक यशस्वी व उच्चपदस्थ पालक पाल्यांना आमच्याकडे दाखल करताना म्हणतात, हा माझा क्लास आहे, हे माझे शिक्षक आहे. मी येथे घडलो. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया हेच महावीर क्लासेसच्या  यशाचे अलिखीत पाठबळ आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे.

आज एवढेच ...धन्यवाद ...

Comments

Popular posts from this blog

मुलांना अभ्यासाच्या उत्तम सवयी कशा लावाव्यात ?

शालेय, महाविद्यालयीन जीवनातील किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील परिक्षेला सामोरे जावून य़श मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येकाला करावा लागतो. यश मिळवणे तसे अवघड असले तरी सातत्याचे परिश्रम, प्रयत्न व चिकाटी लक्षात घेता यश मिळवणे तसे सोपेही असते. परिक्षेतील असो की व्यवहारातील असो कोणतेही यश मिळविण्यासाठी नियोजन, सूत्र, आखणी आणि निश्चित दिशा गरजेची असते. यशाचे अंतिम ठिकाण निश्चित असले की तसे प्रयत्न केले जातात आणि परिश्रमही घ्यावे लागतात.   

मुलांसह पालकांचे कौन्सिलींग आवश्यक

दहावी, बारावीनंतर पाल्यांचे करियर कोणत्या क्षेत्रात घडवावे असा प्रश्न पालकांना असतो. याबरोबरच विद्यार्थी सुद्धा कोणत्या शाखेकडे जावे याविषयी साशंक असतात. दहावी, बारावीच्या परीक्षेत कितीही गुण मिळाले तरी पुढील पदवी शिक्षणाची दिशा निवडताना सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य होवून बसले आहे. याशिवाय उच्च शिक्षणाशी संबंधित प्रवेश प्रक्रिया फार गुंतागुंतीची होत चालली आहे. अशा प्रवेश परीक्षांचे प्रवेश अर्ज भरण्यापासून तर कॉलेजसाठीचा चॉईस निवडण्यापर्यंत अनेक अडथळे विद्यार्थी व पालकांना पार पाडावे लागतात. हा सर्व अनुभव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या कल चाचण्या घेणे आणि त्यावरुन त्यांच्या आवडीचे किंवा गुणवत्तेचे क्षेत्र निवडणे सोपे जाते.