गणेश कॉलनीतील एका छोट्या खोलीत महावीर क्लासचा प्रारंभ मी केला. सुरुवातीला ८/१० मुले होती. पण मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी माझी मेहनत करायची आणि मुलांकडून करून घ्यायची तयारी होती. त्यामुळे दरवर्षी निकालाच्या व मुलांच्या वाढीव गुणवत्तेच्या टक्केवारीमुळे विद्यार्थी संख्या विक्रमी वाढत गेली. पूर्वी माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळात मेरिटमधील मुलांची यादी तयार होत असे. या मेरिटच्या यादीत नंबर मिळावा म्हणून मुले अत्यंत कठोरपण आणि परिश्रमपूर्वक मेहनत करीत. गुणवत्ता यादीत नंबर मिळवू शकतील अशा मुलांना आम्हीही जादा वेळ देत असू.
मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांची फळी आम्ही तयार केली. स्वतंत्र विषयाला स्वतंत्र शिक्षक हा पायंडा मी सुरू केला. या शिक्षकांना वेतनही त्याकाळात इतरांपेक्षा जास्त दिले. त्यामुळे ती मंडळीही मुलांची गुणवत्ता वाढविण्यासाठी निष्ठेने काम करीत.
मला चांगले आठवते, शहरातील नामांकित शाळांमधील मुले आमच्या क्लासचे विद्यार्थी असत. १० वी, १२ वीची मुले शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या रोजच्या तासांना जाणे टाळत. शिकवणी वर्गात नियमित येत. १० वीला ३० गुण आणि १२ वी ला ६० गुण प्रात्यक्षिक परीक्षेसाठी असत. त्याचीही तयारी करण्यासाठी आम्ही विज्ञान प्रयोगशाळा सुरू केली होती. अभ्यासक्रम पूर्ण करून आम्ही सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यावर भर देतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची उजळणी होवून त्यांच्यात परीक्षा देण्याचा आत्मविश्वास वाढतो. याचा सकारात्मक परिणाम होवून महावीर क्लासचे सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येत. निकालानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही त्याच दिवशी करत असतो. या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित असतात. शाळा, महाविद्यालयांचे कार्यक्रम टाळून गुणवंत विद्यार्थी क्लासचा सत्कार स्वीकारतात. हे आमच्या गुवणत्तेचे आणि त्यातील सातत्य टीकवून ठेवणाऱ्या व्यवस्थेचे वैशिष्ट्ये आहे.
क्लासच्या प्रारंभीच्या अडचणीही तशा खुप होत्या. पहिला फळा शेवडेसरांनी दिला होता. पण मुलांना बसायला वर्गात बैंच नव्हते. ते सुध्दा मी उधारीवर आणले. लोकांनी विश्वास दाखवून मला दिले. वर्गाच्या भिंतींना देण्यासाठी रंग उधारीवर आणला आणि पेंटरने रंगकाम केल्यानंतर प्रतिक्षा करून मजुरी घेतली. एक गोष्ट मी पहिल्यापासून केली. मला मदत करणाऱ्यांचे व्यवहार मी हातात पैसा आल्यानंतर चोखपणे पूर्ण केले. त्यामुळे जळगाव शहरात महावीर क्लासची व्यावहारिक पत आणि प्रतिष्ठा निर्माण झाली. माझ्या कामाला कधीही कोणीही नाही म्हटले नाही.
मला क्लास चालवताना वेगळे प्रयोग करायचे होते. मुलांची गुणवत्ता आणि गुण वाढावेत म्हणून मी मुंबई, पुण्यात १० वी, १२ वीच्या उत्तरपत्रिका तपासणारे मॉडरेटर तथा चिफ मॉडरेटर यांना जळगावात मार्गदर्शनासाठी आणले. तीन दिवस असे वर्ग होत. मुंबई, पुण्याची मंडळी जळगावला यायला फारशी उत्सुक नसत. मग मी त्यांना अजिंठा किंवा वेरुळ दाखवायचे निमित्त करून आणत असे. अभ्यासक्रम बदलला की असे वर्ग मुले, पालक व शिक्षकांसाठी घेत असे. या प्रकारामुळे जळगाव शहर व जिल्ह्यातील शिक्षकांचा महावीर क्लासकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. तो सकारात्मक झाला.
मी स्वतः इतर खासगी शिकवणी वर्गातील व्यवस्थापन व शैक्षणिक सुधारणांची माहिती घेत असे. त्याकाळी जळगावात फारसे वर्ग नसत. मी मुंबईच्या नामवंत अग्रवाल क्लासेसमध्ये जावून पाहणी करून व माहिती घेवून आलो होतो. इतर ठिकाणाहून माहिती घेत ९ वी ते १२ वी च्या मुलांसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयी मार्गदर्शन वर्गही आम्ही घ्यायला लागलो. त्यातून मुलांना पारंपरिक शिक्षणाशिवाय इतर अभ्यासक्रमांची माहिती मिळू लागली. स्पर्धा परीक्षांसाठी वातावरण तयार होवू लागले. मुलांसह पालकांचा महावीर क्लासवर विश्वास वाढू लागला. मी एक बाब अभिमानाने लिहू शकतो. ती म्हणजे, क्लाससाठी विद्यार्थी वाढावेत म्हणून मी कोणताही वेगळा आणि देवाण घेवाण व्यवहार केला नाही. क्लासच्या गुणवत्तेसंदर्भात मुले आणि त्यांच्या पालकांनीच मौखिक चर्चा केली आणि आम्ही विस्तारत गेलो. मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी आता आम्ही दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवतो. त्या संदर्भात सविस्तर नंतर बोलू या.
आज एवढे पूरे, पुन्हा भेटू नव्या विषयासह ... !!!

Comments
Post a Comment