Skip to main content

सर्वोत्तम शैक्षणिक सुविधांचा ध्यास

महावीर क्लासचा २९ वर्षांचा प्रवास हा खासगी क्षेत्रात विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या दर्जेदार शैक्षणिक सुविधा देणारा राहिला आहे. सन १९८७ पासून आजपर्यंत आम्ही आमच्याशीच स्पर्धा करीत आलो आहोत. पाचवी ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनचा लाभ एकाच छताखाली व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत.

अगदी प्रारंभीच्या काळात आम्ही मुंबई, पुण्याच्या काही खासगी क्लासेसमधील तज्ञांना मार्गदर्शनासाठी जळगावला आणले. मात्र, नंतरच्या प्रवासात आम्हीच आमच्या प्रगतीच्या पाऊल खुणा रोवल्या. त्या इतरांसाठी मार्गदर्शक तर आमच्यासाठी अजून गुणवत्तेत वाढ करायला संधी आहे, असे सांगणाऱ्या आहेत. मागे वळून पाहाताना माझ्या लक्षात येते की, खासगी शिकवणी वर्गात अनेक नाविन्यपूर्ण संकल्पनांना आम्ही प्रारंभ केला आणि त्याला मूर्त रुपही आणले. वी आर दी पायोनियर आफ इनोव्हेटीव्ह आयडीयाज् इन प्रायव्हेट एज्युकेशनल क्लासेस असे आम्ही अभिमानाने म्हणू शकतो.उत्तम शैक्षणिक व्यवस्थापन, गुणवत्ता वाढविणारे दर्जेदार शिक्षण याच्या कसोटीवर आयएसओ दर्जा मिळविणारे महावीर क्लासेस एकमेव आहे. स्वतःच्या कार्पोरेट सुविधा असणारे महावीर क्लासेस एकमेव आहे. दरवर्षी निकालाची गुणवत्ता व संख्या वाढविणारे महावीर क्लासेस एकमेव आहे. विद्यार्थी आणि पालकांशी नियमित संवाद साधून विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्स करणारे महावीर क्लासेस एकमेव आहे. अशा कितीतरी क्षेत्रात महावीर क्लासेसची कामगिरी उत्तम आणि स्वतःशीच स्पर्धा करणारी आहे.

आम्ही १९८७ मध्ये क्लासेसला प्रारंभ केला. तेव्हा जागा लहान होती आणि विद्यार्थी संख्याही कमी होती. पण शैक्षणिक व्यवस्थापनाची शिस्त आम्ही तेव्हा पासून पाळत आलो आणि त्यात काळानुरुप बदल करीत सुधारणा केल्या. २००३ पासून क्लास मॅनेजमेंट पूर्णतः संगणकीकृत झाली. विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी आम्ही बायोमेट्रीक हजेरी म्हणजे थंब इंप्रेशनवर हजेरी नोंद सुरू केली. या बरोबरच पालकांना मुलांच्या अनुपस्थितीची माहिती एसएमएसद्वारे देणे सुरू केले. शिवाय मुलांच्या प्रगतीचे रिपोर्ट कार्डही टपालाने पाठविणे सुरू केले.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखून आम्ही दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा शिक्षण उपक्रमही सुरी केला होता. पूर्वी मुलांना शैक्षणिक प्रयोग विशिष्ट गुणांसाठी होते. त्यामुळे त्याचा सराव करून घेण्यासाठी आम्ही शिकवणी वर्गात प्रयोगशाळा सुरू केली होती. अशा प्रकारचा प्रयोग महाराष्ट्रात कोणत्याही खासगी शिकवणी वर्गाने केलेला नाही.

पूर्वी केवळ बारावीच्या गुणांवर वैद्यकिय किंवा अभियांत्रिकी शाखांच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश मिळत असे. तेव्हा जळगाव शहरातून या दोन्ही शाखांना दरवर्षी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या महावीर क्लासेसच्या विद्यार्थ्यांची असे. शिवाय, दहावी, बारावी परीक्षा मंडळाकडून जाहीर होणाऱ्या गुणवत्ता यादीत नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांच्या तुलनेत जळगावचे विद्यार्थी जास्त असत. त्यात महावीरचे विद्यार्थी बहुतांश असत. आज या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा आहेत. त्याची स्वतंत्र तयारी आही महावीर क्लासेसमध्ये करून घेतो. या परीक्षांच्या निकालातही महावीर क्लासेसच्या यशाचा टक्का इतरांच्या तुलनेत खूपच मोठा आहे.
मुलांना केवळ पाठ्यपुस्तकांचे शिक्षण न देता त्यांचे व्यक्तिमत्व इतरही क्षेत्रात आणि विषयात विकसीत व्हावे म्हणून न २००३ च्या सुमारास महावीर क्लासेसमध्ये स्वतंत्र ग्रथांलय सुरू करण्यात आले. विविध प्रकारची, क्षेत्रांची माहिती देणारी सुमारे तीन हजारावर पुस्तके, ग्रंथ येथे आहेत. या ग्रंथालयात वाचन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. आता डिजिटल ग्रंथालय करण्यात आले असून तेथे सीडीच्या माध्यमातून मुले ई बुक्स वाचू शकतात. या सोबतच मुलांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून अक्वागार्डची सोय आहे. प्रत्येक वर्गात एलसीडी प्रोजेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरा या सुविधा पूर्वीपासून आहेत.

उत्तर महाराष्ट्रात खासगी क्लासेसची स्वतंत्र व प्रशस्त इमारत, उत्तम शैक्षणिक व्यवस्थापन या बाबी जमेच्या असल्यामुळे महावीर क्लासेसने आयएसओ प्रमाणपत्रासाठीची गुणवत्ता स्वतःमध्ये निर्माण केली. हे प्रमाणपत्र २००९-१० मध्ये मिळाले. त्यासाठी केलेल्या शैक्षणिक व्यवस्थापनाचा दर्जा आजही कायम असून त्यात नवे तंत्र वापरून अधिकाधीक गतिशील व परिणामकारक व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचाच सकारात्मक परिणाम होवून जळगाव शहरातील सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेला खासगी शिकवणी वर्ग असा लौकिक महावीर कलासेसने मिळविला आहे. केवळ जळगाव जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून विद्यार्थी येथे शिकवणी घेण्यासाठी येत आहेत.

विद्यार्थी संख्या सर्वाधिक असल्याचा दावा जेव्हा आम्ही करीत असतो तेव्हा क्लासमधील प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारत असतो. म्हणूनच प्रत्येक मुलावर लक्ष देता येईल एवढा पुरेसा कर्मचरी, शिक्षक वृंद नेमण्याची जबाबदारी महावीर क्लासेसचे व्यवस्थापन चोखपणे पार पाडत असते. आज संपूर्ण जळगाव शहरात खासगी शिकवणी वर्गात प्रत्येक विषयासाठी स्वंतत्र शिक्षक असलेला एकमेव महावीर क्लासेस आहे. एवढेच नव्हे तर संपूर्ण वर्षभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांचे गेस्ट लेक्चर घेवून विद्यार्थांना व पालकांना सतर्क, जागृक करण्याचे कार्य महावीर क्लासेसतर्फे सुरू असते.

महावीर क्लासेसमध्ये मुलांचा प्रवेश घेताना आम्ही पाल्यआणि पालकांशी सविस्तर संवाद करतो. पाल्य आणि पालकांचा कल समजून घेतो. त्यानंतर विविध प्रकारच्या उपक्रमातून पालकांशी संपर्क असतो. एखाद्या विषयात कमी प्रगती असलल्या विद्यार्थांसाठी जादा वर्ग घेणे किंवा गुणवत्ता वाढीसाठी हुशार मुलांची जादी तासिका घेणे असेही प्रयोग आम्ही करीत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटत नाही. कोणत्याही वर्गात शिकवणी घेणाऱ्या मुलांकडून सर्वाधिक प्रश्नपत्रिका सोडवून घेण्याचा आणि मुल्यांकन करण्याचा नियमित प्रयत्न महावीर क्लासेसमध्ये करण्यात येतो. सातवी ते बारावीच्या मुलांचे इंग्लिश विषयाचे ग्रामर पक्के करुन घेण्यासाठी ग्रामर बॅच जवळपास सहावर्षे सुरू होती.

स्पर्धा, प्रवेश परिक्षांचा सराव व तयारी

महावीर क्लासेसची अजून एक परंपरा आहे. ती म्हणजे शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील सर्व प्रकारच्या स्पर्धा, प्रवेश परिक्षांचा सराव व तयारी आम्ही करून घेण्याची.  स्कॅलरशिपसह सीईटी, जेईई, केव्हीपीवाय (किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना), एनटीएसई,  मैथेक्स, आयआयटी, आल ईन वन, एआयपीएमटी, आलंपियाड अशा जवळपास सर्वच परीक्षांची तयारी आम्ही विद्यार्थ्यांकडून करून घेतो.
महावीर क्लासेसचा २९ वर्षांचा प्रवास हा सतत गुणवत्तेकडून गुणवत्तेकडे आणि आमची स्पर्धा आमच्या स्वतःचीच याच भूमिकेतून सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रातील आणि जळगाव जिल्ह्यातील पालक, विद्यार्थी आणि समाजाचा विश्वास आमच्यावर आहे, हे आनंद देणारे आहे. सविस्तर मांडलेला विषय थांबवतो.
पुन्हा भेटू नव्या विषयासह ....

Comments

Popular posts from this blog

मुलांना अभ्यासाच्या उत्तम सवयी कशा लावाव्यात ?

शालेय, महाविद्यालयीन जीवनातील किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील परिक्षेला सामोरे जावून य़श मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येकाला करावा लागतो. यश मिळवणे तसे अवघड असले तरी सातत्याचे परिश्रम, प्रयत्न व चिकाटी लक्षात घेता यश मिळवणे तसे सोपेही असते. परिक्षेतील असो की व्यवहारातील असो कोणतेही यश मिळविण्यासाठी नियोजन, सूत्र, आखणी आणि निश्चित दिशा गरजेची असते. यशाचे अंतिम ठिकाण निश्चित असले की तसे प्रयत्न केले जातात आणि परिश्रमही घ्यावे लागतात.   

मुलांसह पालकांचे कौन्सिलींग आवश्यक

दहावी, बारावीनंतर पाल्यांचे करियर कोणत्या क्षेत्रात घडवावे असा प्रश्न पालकांना असतो. याबरोबरच विद्यार्थी सुद्धा कोणत्या शाखेकडे जावे याविषयी साशंक असतात. दहावी, बारावीच्या परीक्षेत कितीही गुण मिळाले तरी पुढील पदवी शिक्षणाची दिशा निवडताना सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य होवून बसले आहे. याशिवाय उच्च शिक्षणाशी संबंधित प्रवेश प्रक्रिया फार गुंतागुंतीची होत चालली आहे. अशा प्रवेश परीक्षांचे प्रवेश अर्ज भरण्यापासून तर कॉलेजसाठीचा चॉईस निवडण्यापर्यंत अनेक अडथळे विद्यार्थी व पालकांना पार पाडावे लागतात. हा सर्व अनुभव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या कल चाचण्या घेणे आणि त्यावरुन त्यांच्या आवडीचे किंवा गुणवत्तेचे क्षेत्र निवडणे सोपे जाते.  

महावीर क्लास ३० वर्षांच्या परंपरेत अव्वलच !!

सध्या परीक्षांचे निकाल लागण्याचा हंगाम आहे. दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. आता विद्यार्थी आणि पालक पुढील शिक्षण कोणते घ्यावे ? या विषयी निर्णय घेत आहेत. पारंपरिक क्षेत्रातील पदवी आणि इतर वेगवेगळ्या नव्या   क्षेत्रातील शिक्षणांच्या संधी मुलांच्या समोर आहेत. हा काळ शांतपणे व विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. मुलांनी व पालकांनी घाई न करता मुलांच्या शिक्षणाचा कल, क्षमता लक्षात घेवून पुढील शिक्षणाचा मार्ग निवडावा. मुलांच्या भावी जीवनाला आकार देण्याचा हाच काळ असतो. अशावेळी पालकांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी महावीर क्लासेसच्या माध्यमातून आम्हीही पार पाडत   असतो. अशा प्रकारच्या सहकार्यास आम्ही व आमचे तज्ञ नेहमी तयार असतो.