Skip to main content

Posts

Showing posts from 2016

मुलांना अभ्यासाच्या उत्तम सवयी कशा लावाव्यात ?

शालेय, महाविद्यालयीन जीवनातील किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील परिक्षेला सामोरे जावून य़श मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येकाला करावा लागतो. यश मिळवणे तसे अवघड असले तरी सातत्याचे परिश्रम, प्रयत्न व चिकाटी लक्षात घेता यश मिळवणे तसे सोपेही असते. परिक्षेतील असो की व्यवहारातील असो कोणतेही यश मिळविण्यासाठी नियोजन, सूत्र, आखणी आणि निश्चित दिशा गरजेची असते. यशाचे अंतिम ठिकाण निश्चित असले की तसे प्रयत्न केले जातात आणि परिश्रमही घ्यावे लागतात.   

मुलांसह पालकांचे कौन्सिलींग आवश्यक

दहावी, बारावीनंतर पाल्यांचे करियर कोणत्या क्षेत्रात घडवावे असा प्रश्न पालकांना असतो. याबरोबरच विद्यार्थी सुद्धा कोणत्या शाखेकडे जावे याविषयी साशंक असतात. दहावी, बारावीच्या परीक्षेत कितीही गुण मिळाले तरी पुढील पदवी शिक्षणाची दिशा निवडताना सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य होवून बसले आहे. याशिवाय उच्च शिक्षणाशी संबंधित प्रवेश प्रक्रिया फार गुंतागुंतीची होत चालली आहे. अशा प्रवेश परीक्षांचे प्रवेश अर्ज भरण्यापासून तर कॉलेजसाठीचा चॉईस निवडण्यापर्यंत अनेक अडथळे विद्यार्थी व पालकांना पार पाडावे लागतात. हा सर्व अनुभव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या कल चाचण्या घेणे आणि त्यावरुन त्यांच्या आवडीचे किंवा गुणवत्तेचे क्षेत्र निवडणे सोपे जाते.  

शिक्षकाने मेणबत्तीसारखे व्हावे

शिक्षकदिन तोंडावर आला आहे. शिक्षक हा घटक आजही सर्व प्रकारचे कौशल्यपूर्ण काम शिकवणारी माताच आहे म्हणजे, Teacher is the Mother of all Professions. . माजी राष्ट्रपती तथा शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर शिक्षकदिन म्हणून साजरा होतो. यामागे भूमिका अशी की, डॉ. राधाकृष्णन हे महान विचारवंत व देशाचे राष्ट्रपती होते. शिक्षकाचा एवढा मोठा सन्मान भारतवर्षांत झाला. त्यांचाच गौरव म्हणून शिक्षकदिन साजरा होतो. 

मुलांना जिंकायेच शिकवा !!

गेल्या काही दिवसांत विविध शाळांमधील मुलांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये यामिनित्त नव्या आव्हानांवर बोलता आले. मुलांशी संवाद करताना त्यांना सोप्या भाषेत समजून सांगावे लागते. त्यांचा मनांतील भावविश्वाला तडा न देता त्यांना नव्या संकल्पना समजावून सांगाव्या लागतात. हे काम तसे कौशल्याने केले पाहिजे. मुलांना समजतील अशा गोष्टीचा, कथांचा वापर त्यासाठी करावा लागतो. मुलांच्या समस्यांवरील उत्तर शोधताना अशा गोष्टी, कथा उपयुक्त ठरतात. त्या सांगितल्यामुळे नेमका परिणाम साधला जातो.

मुलींचे वेळीच समुपदेशन करा

महावीर क्लासेसचे काम करीत असताना इतरही अनेक संस्थांमध्ये मुला-मुलींच्या कौन्सिलिंगला मला जावे लागते. तेथे विद्यार्थी-विद्यार्थिनिंशी संवाद साधावा लागतो. त्यांची आवड, निवड व सवयी लक्षात घेवून विषयांची मांडणी करावी लागते. आजच्या मुलांचे जसे नियमित शिक्षण, अभ्यासाचे प्रश्न आहेत तसेच त्यांच्या मानसिक जडण-घडणचेही प्रश्न आहेत. आर्थिकस्तर उच्च श्रेणीत असलेल्या पाल्यांचे व अर्थिकस्तर अगदीच बेताचा असलेल्या पाल्याचे प्रश्न वेगवेगळे असतात. आर्थिकस्तर उच्च असेल तर पालक मानसोपचारतज्ञांकडे पाल्यास घेवून जातात. परंतु, अगदीच खालच्या आर्थिक स्तराखालील पाल्यांचे मानसिक विश्व अनेक प्रकारच्या न्यूनगंडांनी भरलेले असते. असे न्यूनगंड काढायचे असतील किंवा दूर करायचे असतील तर पाल्यांशी संवाद जाणिवपूर्वक विषयांचे नियोजन करून करावा लागतो. अशाच प्रकारचा अनुभव मला जळगाव येथील महात्मा गांधी हरिजन कन्या छात्रालयातील विद्यार्थीनींशी बोलताना जाणवला. 

महावीर क्लास ३० वर्षांच्या परंपरेत अव्वलच !!

सध्या परीक्षांचे निकाल लागण्याचा हंगाम आहे. दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. आता विद्यार्थी आणि पालक पुढील शिक्षण कोणते घ्यावे ? या विषयी निर्णय घेत आहेत. पारंपरिक क्षेत्रातील पदवी आणि इतर वेगवेगळ्या नव्या   क्षेत्रातील शिक्षणांच्या संधी मुलांच्या समोर आहेत. हा काळ शांतपणे व विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. मुलांनी व पालकांनी घाई न करता मुलांच्या शिक्षणाचा कल, क्षमता लक्षात घेवून पुढील शिक्षणाचा मार्ग निवडावा. मुलांच्या भावी जीवनाला आकार देण्याचा हाच काळ असतो. अशावेळी पालकांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी महावीर क्लासेसच्या माध्यमातून आम्हीही पार पाडत   असतो. अशा प्रकारच्या सहकार्यास आम्ही व आमचे तज्ञ नेहमी तयार असतो.

मेकिंग ओन्ली पेपरटायगर्स ...

शालेय शिक्षणातील ८ वी पर्यंतच्या परीक्षा बंद करण्याच्या जंजाळात सध्याच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करीत आहे. महावीर क्लासेसच्या माध्यमातून आज आम्ही ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी खासगी शिकवणी वर्ग घेत आहोत. शालेय व कनिष्ट महाविद्यालयीन स्तरावरील बदललेले अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीतील बदल याचा चांगला – वाईट अनुभव आमच्या गाठीला आहे. शालेय पातळीवर आठवीपर्यंतची परीक्षा गेल्या सहा वर्षांपासून बंद आहे. विद्यार्थी परीक्षा न देता थेट नववीत येत आहे. त्या वर्गात पहिली परीक्षा त्याला द्यावी लागते. आठवीपर्यंत परीक्षाच नसल्याने विद्यार्थ्यांची गणित, विज्ञान या विषयांची पायाभूत तयारीच होत नसल्याचे आम्हाला आढळून येत आहे. 

अजिंठा दाखवायचे निमित्त करून तज्ञशिक्षकांना आणले ...!!

गणेश कॉलनीतील एका छोट्या खोलीत महावीर क्लासचा प्रारंभ मी केला. सुरुवातीला ८/१० मुले होती. पण मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी माझी मेहनत करायची आणि मुलांकडून करून घ्यायची तयारी होती. त्यामुळे दरवर्षी निकालाच्या व मुलांच्या वाढीव गुणवत्तेच्या टक्केवारीमुळे विद्यार्थी संख्या विक्रमी वाढत गेली. पूर्वी माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळात मेरिटमधील मुलांची यादी तयार होत असे. या मेरिटच्या यादीत नंबर मिळावा म्हणून मुले अत्यंत कठोरपण आणि परिश्रमपूर्वक मेहनत करीत. गुणवत्ता यादीत नंबर मिळवू शकतील अशा मुलांना आम्हीही जादा वेळ देत असू. मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांची फळी आम्ही तयार केली. स्वतंत्र विषयाला स्वतंत्र शिक्षक हा पायंडा मी सुरू केला. या शिक्षकांना वेतनही त्याकाळात इतरांपेक्षा जास्त दिले. त्यामुळे ती मंडळीही मुलांची गुणवत्ता वाढविण्यासाठी निष्ठेने काम करीत.

सर्वोत्तम शैक्षणिक सुविधांचा ध्यास

महावीर क्लासचा २९ वर्षांचा प्रवास हा खासगी क्षेत्रात विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या दर्जेदार शैक्षणिक सुविधा देणारा राहिला आहे. सन १९८७ पासून आजपर्यंत आम्ही आमच्याशीच स्पर्धा करीत आलो आहोत. पाचवी ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनचा लाभ एकाच छताखाली व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत.

वडीलांच्या संस्कारांची पुण्याई

जवरीलालजी गादिया, सौ. लिलाबाई यांच्या सह नात दर्शना व नातू धर्मेश हाय फ्रेंड्स चिंतन या नावाने मी माझा ब्लॉग लिहायला सुरवात करतोय. चिंतन एवढ्यासाठीच की, गेल्या २८ वर्षांच्या व्यावसायिक आणि सामाजिक वाटचालीत अनेक अनुभवांचे संचित मनात साचले आहे. त्याला व्यक्त करण्यासाठी मी जागा शोधत होतो. ब्लॉग सारख्या माध्यमातून जगाच्यास्तरावर गप्पा मारायला उपलब्ध असलेल्या संधीचा वापर करून घेण्याची मला ईच्छा झाली. या माध्यमाला गती आणि सर्वाधिक पोहच आहे हेही लक्षात घेतले. अखेर चिंतन नावाने ब्लॉगचा श्रीगणेशा करीत आहे.